मनोरंजन

‘आयफा’मध्ये सलमानचे जोरदार स्वागत

Shambhuraj Pachindre

22 व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यासाठी संयुक्त अरब अमिरातच्या अबुधाबीमध्ये फिल्मी तार्‍यांचे आगमन होणे सुरू झाले आहे. मुख्य सोहळा शनिवारी रात्री असला तरी गुरुवारपासूनच त्यासाठीची लगबग सुरू झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे व तो अबुधाबीत पोहोचल्यावर विमानतळावरच चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. अबुधाबीजवळील 'येस आयलंड' या बेटावर हा सोहळा होणार आहे.

SCROLL FOR NEXT