मनोरंजन

आयटम गर्ल नवाझुद्दिन!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

नवाझुद्दिन सिद्दिकी काय दमाचा अभिनेता आहे, हे नव्याने कुणाला सांगण्याची गरज नाही. त्याच्या इतक्या विविधांगी भूमिका मोजक्याच अभिनेत्यांना साकारायला मिळत असतात. आताही अशाच एका अतरंगी अवतारामुळे नवाझ चर्चेत आला आहे. नुकतीच बॉलीवूडची 'पंगा'क्‍वीन कंगना राणावतने नवाझचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नवाझुद्दिन चक्‍क आयटम गर्लच्या वेशात दिसतो आहे. नवाझच्या आगामी 'टिकू वेडस् शेरू'या चित्रपटातील हा लूक आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. या चित्रपटाची निर्माती कंगना आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. साई कबीर चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाद्वारे अवनीत कौर ही टी.व्ही.वरील अभिनेत्री बॉलीवूड पदार्पण करत आहे.

SCROLL FOR NEXT