मनोरंजन

आम्ही एकमेकांच्या जीवनात करीत नाही ढवळाढवळ : अक्षयकुमार

Shambhuraj Pachindre

एका मुलाखतीत अक्षयकुमारने ट्विंकलबरोबरच्या आपल्या सुखी संसाराचे एक रहस्य सांगितले. त्याने म्हटले की आम्ही दोघेही एकमेकांच्या जीवनात कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. खरे तर आम्हा दोघांचे विचार अतिशय वेगळे असतात; पण तरीही यामुळे आमच्या संसारात वाद निर्माण होत नाहीत.

कामाच्या बाबतीत बोलायचे तर मी जर एखाद्या चित्रपटाबाबत ट्विंकलला सल्ला विचारला तर ती तसा देते. जर तिने एखादे स्तंभलेखन केले असेल व मला वाचण्यास सांगितले तर मी वाचतो. जर तिने विचारले तर मी माझा अभिप्रायही देतो. जर तिने विचारलेच नाही तर गप्प राहणेच मी पसंत करतो! मी तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर करीत नाही की ती माझ्या लाईफमध्ये!

SCROLL FOR NEXT