अभिनेत्री शहनाझ गिल नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा नवा शो देसी वाइब्स विद शहनाज गिल चर्चेत आहे. शहनाझच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. याचदरम्यान तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती खूपच संतापलेली दिसत आहे. प्रसिद्ध फोटो आणि व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात शहनाझ माध्यमांशी बोलत आहे. एका व्यक्तीशी बोलत असताना दुसरी एक व्यक्ती पुन्हा पुन्हा शहनाझचे नाव घेत असलेले ऐकू येत आहे. यामुळे शहनाझला राग अनावर झाला. व्हिडीओत ती म्हणत आहे की, हा अपमान आहे. आता आम्ही बोलत आहोत तर तुम्ही ते ऐकले पाहिजे. त्याला सांगा तू गप्प बस. शहनाझच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी शहनाझच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे तर काहींना मात्र तिचे वागणे अजिबात आवडलेले नाही.