मनोरंजन

अमिताभ बच्चन : जोशात रॅम्पवर पुन्हा येईन

स्वालिया न. शिकलगार

वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन अद्यापही जोमाने काम करत असतात. बिग बी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे प्रोजेक्ट के. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. हैदराबादमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यांना दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बिग बी सध्या विश्रांती घेत आहे. दरम्यान, त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे, यातून त्यांच्यात केवढा उत्साह आहे याची प्रचिती येईल. बिग बी यांनी काळा डिझायनर कुर्ता आणि पायजमा या वेशभूषेतील एका फॅशन शोच्या रॅम्पवरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. माझ्या तब्येतीसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी बरा झालो आहे. लवकरच याच जोशात रॅम्पवर पुन्हा येईन अशी आशा करतो, असे त्यांनी लिहिले आहे. या लुकमध्ये बिग बी एकदम डॅशिंग दिसत आहेत. हा फोटो पाहून त्यांचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

SCROLL FOR NEXT