पुढारी ऑनलाईन डेस्क
अनुष्का शर्मा आता पुनरागमनाच्या तयारीत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या आयुष्यावरील 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटात ती झुलनची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यासाठी अनुष्का सध्या कठोर मेहनत घेत आहे. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजीचा सराव करीत असताना दिसून येते. हा व्हिडीओ शेअर करीत असताना तिने 'गेट स्वेट गो' असे लिहिले आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनुष्काला क्रिकेटचे धडे घेत असताना नवरोबा विराट कोहलीकडूनही मदत मिळत आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे!