मनोरंजन

अनन्यासोबत अफेअरबाबत आदित्यचा खुलासा

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री अनन्या पांडे ज्या चित्रपटात काम करते त्या चित्रपटातील हीरोसोबत तिचे नाव जोडले जाते. 'लायगर' चित्रपटातील विजय देवरकोंडाशी तिचे नाव जोडले गेले. 'पती पत्नी और वो'वेळी कार्तिक आर्यनशी आणि 'खालि पिली'वेळी ईशान खट्टरशी तिचे नाव जोडले गेले होते. आता तिचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याशी जोडले जात आहे. आदित्य आणि अनन्या सध्या एका चित्रपटात काम करत आहेत. करण जोहरच्या चॅट शोमध्ये नुकतेच अनन्याने आदित्य रॉय कपूरला 'हॉट' असे संबोधले होते. करणनेही या दोघांच्या रिलेशनशिपबाबत हिंट दिली होती. गेल्या काही काळात आदित्य आणि अनन्या यांच्यात जवळीक दिसून आली आहे. विविध पार्ट्यांमध्ये दोघे एकत्र दिसून आले आहेत. आदित्यला याबाबत विचारणा केली असता त्याने अनन्याबाबत काहीही बोलणे टाळले; मात्र लग्नावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे सांगितले. जेव्हा लग्न होईल तेव्हा होईल. सध्या लग्नाबाबत माझी काहीही योजना नाही, असेही आदित्य म्हणाला.

SCROLL FOR NEXT