मनोरंजन

अथिया-राहुल लवकरच लग्न करणार

स्वालिया न. शिकलगार

अभिनेता सुनील शेट्टी याची कन्या अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल अनेक महिन्यांपासून डेट करत आहेत. या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा होत असते. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपासून हे दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांवर अथियाचे वडील सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाबाबत महत्त्वाची माहिती त्याने यावेळी दिली आहे. सुनील शेट्टीने अथिया आणि राहुल लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अथिया-राहुल लग्न कधी करणार, असा प्रश्न जेव्हा सुनील शेट्टीला विचारण्यात आला तेव्हा त्याने लवकरच त्यांचे लग्न होईल, अशी प्रतिक्रिया दिली. हे उत्तर देतानाच त्याने या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना पुष्टी दिली, तसेच दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले.

SCROLL FOR NEXT