मनोरंजन

अजय देवगणचा येणार ’ द़ृश्यम 2’

अनुराधा कोरवी

पुढारी वृत्तसेवा :  मल्याळम सुपरस्टार मोहनलाल याच्या 'द़ृश्यम' वरून अजय देवगणने दिग्दर्शक निशिकांत कामतसोबत हिंदीत त्याचा रीमेक केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मूळ चित्रपटच भन्नाट होता. त्यामुळे रीमेकही उत्तम चालला. एक वर्षापूर्वी मोहनलालच्या मूळ चित्रपटाचा 'द़ृश्यम 2' हा सीक्वेल प्रदर्शित झाला. त्यानंतर अजय देवगणनेही 'द़ृश्यम 2'च्या हिंदी रीमेकची घोषणा केली. हा हिंदी चित्रपट याच वर्षी रीलिज होत आहे.

तोपर्यंत आता तिकडे दक्षिणेत मल्याळम सिनेमात मोहनलाल यांच्या 'द़ृश्यम 3' ची घोषणा करण्यात आली आहे. 'द़ृश्यम' आणि 'द़ृश्यम 2' हे दोन्ही चित्रपट उत्तम स्टोरीलाईन असलेले सस्पेन्स चित्रपट आहेत. आता तिसर्‍या भागातही मोहनलाल पुन्हा एकदा जॉर्ज कुट्टी बनून पोलिसांसोबत सस्पेन्सचा खेळ डाव खेळताना दिसेल. त्यामुळे द़ृश्यमच्या तिसर्‍या भागाची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी कन्नड, तेलगू आणि तमिळ भाषेतही 'द़ृश्यम'चे रीमेक झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT