पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण व 'थ्री इडियटस्' स्टार आर. माधवन एका सुपरनॅचरल थ्रिलरमध्ये एकत्रित झळकणार आहेत. या चित्रपटाचे मुंबई, मसुरी व लंडनमध्ये चित्रीकरण होत आहे. 'क्विन' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असणार आहे.
अजय देवगण फिल्म व पनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली 'द़ृश्यम 2' चे दिग्दर्शक कुमार पाठक व अभिषेक पाठक यांच्यासह अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यापूर्वी रीलिज झालेल्या 'भोला' या अजयच्या मागील चित्रपटाने एकूण 112 कोटी रुपयांची कमाई केली. त्यापूर्वी'द़ृश्यम 2' चित्रपटाने जगभरात 345 कोटी रुपयांचा गल्ला जमवत मोठी मजल मारली होती.