मनोरंजन

अखेर ‘ती’ हो म्हणाली!

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये दिमाखात पार पडला. साखरपुड्यासाठी सिनेसृष्टी आणि राजकारणातील 100 हून अधिक लोक उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहे. राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यात राघव आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी परिणिती आणि राघव यांनी खास लूक केला होता. यावेळी परिणितीने पांढर्‍या रंगाचा ड्रेस घातला होता तर राघव यांनी त्याच रंगाचा सूट घातल्याचे पाहायला मिळत आहे. 'मी प्रार्थना केली अखेर ती हो म्हणाली', असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. तसेच त्यांनी अंगठीचा इमोजीही शेअर केला आहे. साखरपुड्याला त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा आणि मनीष मल्होत्रा यांनीही हजेरी लावली. परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी बॉलीवूड थीम ठेवण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT