मनोरंजन

अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा यांची ‘डबल एक्सएल’ची जोडी!

स्वालिया न. शिकलगार

अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा यांनी यापूर्वी 'रावडी राठोड' आणि 'वन्स अपॉन अ टाईम मुंबई-2'मध्ये एकत्रित काम केले आहे. आता अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. दिग्दर्शक मुदस्सर अझीज यांचा आगामी चित्रपट या दोघांनी स्वीकारला आहे.

मुदस्सर अझीज अलीकडच्या काळात खूप व्यग्र आहेत. ते एकाचवेळी अनेक चित्रपटांवर काम करीत आहेत. त्यातीलच एका चित्रपटात अक्षय आणि सोनाक्षी दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव त्यांनी 'डबल एक्सएल' असे ठेवले आहे.

पुढील वर्षी मार्चपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात खिलाडी कुमार आतापर्यंत न दिसलेल्या अवतारात दिसणार आहे. प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने अक्षयला जाडजूड दाखवले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हे एक सरप्राईज असणार आहे.

SCROLL FOR NEXT