झरीन खान नव्या प्रोजेक्टवर लवकरच घोषणा करणार?  instagram
मनोरंजन

झरीन खानने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री झरीन खानने जेव्हा-जेव्हा ऑनस्क्रीन दिसली, तेव्हा ती चर्चेत आली आहे. पाईपलाईनमध्ये पुढे काय आहे हे बघण्यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या उत्सुकतेदरम्यान झरीनने व्यक्त केले की, तिला एका चित्रपटासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत काम करायचे आहे. कॉमेडी, ॲक्शन आणि ड्रामाचा अखंडपणे मिलाफ करण्याच्या त्याच्या गुणवत्तेचे कौतुक करताना ती म्हणाली की, ती 'गोलमाल' किंवा 'चेन्नई एक्स्प्रेस' सारखे काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहे, जे चित्रपट तिला थिएटरमध्ये पाहण्यात खूप आनंद झाला.

ॲक्शन-पॅक आणि कॉमेडी ब्लॉकबस्टर्ससाठी प्रसिद्ध असलेला शेट्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट निर्मात्याबद्दल बोलताना झरीनने शेअर केले, “मी प्रेक्षक म्हणून रोहित शेट्टीच्या चित्रपटांचा आनंद घेते. तो अशा दिग्दर्शकांपैकी एक आहे ज्यांचे चित्रपट मी थिएटरमध्ये पाहते. त्याचा 'गोलमाल : फन अनलिमिटेड' हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे.

सध्या झरीन तिच्या फिटनेसवर काम करत आहे, ज्यामुळे ती तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे की नाही, हे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री सध्या अनेक मनोरंजक स्क्रिप्ट्स वाचत आहे. तिने काही प्रोजेक्ट्स लॉक केले आहेत, ज्यांची ती लवकरच घोषणा करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT