पुढारी ऑनलाईन डेस्क: क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री-कोरिओग्राफर धनश्री वर्मा अलीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, या दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समजते. चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. तर धनश्रीने युजवेंद्रला अनफॉलो केले आहे पण त्याच्यासोबतचे कोणतेही फोटो हटवलेले नाहीत.
टाईम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहीतीनुसार, त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. "घटस्फोट अपरिहार्य आहे, आणि काही काळानंतर तो अधिकृत होईल. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण अद्याप माहित नाही, परंतु हे स्पष्ट आहे की या दोघांनीही त्यांचे जीवन वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे,"