Ahaan Panday Aneet Padda Saiyaara Trailer released
मुंबई - बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आणखी एक स्टार किड डेब्यू करत आहे. बॉलीवूड स्टार चंकी पांडेचा भाचा आणि अनन्याचा चुलत भाऊ अहान पांडेचा आगामी चित्रपट सैयाराचा ट्रेलर रिलीज झालं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरीने केलं आहे. याआधी मोहित एक विलेन, आशिकी २ सारखे रोमँटिक चित्रपट आणले आहेत. आता सैयारामध्ये अहान सोबत मुख्य भूमिकेत अनीत पड्डा दिसणार आहे.
प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणणारी 'सैयारा' ही प्रेमकथा यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांना पहिल्यांदाच एकत्र आणते. दोघांनीही अजरामर प्रेमकथांची निर्मिती केली आहे, आणि यावेळी त्यांच्या सहकार्यामुळे एक नवीन रोमँटिक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.
'सैयारा' सध्या नव्या पिढीसाठी सर्वात चर्चेत असलेली प्रेमकथा आहे. चित्रपटाचे संगीत आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम ठरत आहे. यात फहीम-अर्सलान यांचे टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचे बर्बाद, विशाल मिश्रा यांचे तुम हो तो, सचेत-परंपरा यांचे हमसफर आणि अरिजीत सिंग आणि मिथून यांचे धुन हे गाणे देशभरातील म्युझिक चार्ट्सवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटातून अहान पांडे यशराज फिल्म्सच्या नायक म्हणून पदार्पण करत आहेत. तसेच बिग गर्ल्स डोंट क्राय या मालिकेतून लोकप्रिय झालेली अनीत पड्डा ही वायआरएफची अभिनेत्री म्हणून समोर आली आहे. हा चित्रपट १८ जुलै, २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.