YRF revealed movie Alpha Release Date instagram
मनोरंजन

YRF announced Alpha Release Date | आलिया भट्ट स्टारर अल्फाची प्रतीक्षा संपली, यशराज फिल्म्सने रिलीज तारीख केली जाहीर

YRF announced Alpha Release Date | आलिया भट्ट स्टारर अल्फाची प्रतीक्षा संपली, यशराज फिल्म्सने रिलीज तारीख केली जाहीर

स्वालिया न. शिकलगार

आलिया भट्टच्या ‘Alpha’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची रिलीज डेट यशराज फिल्म्सने जाहीर केली आहे. YRF Spy Universe चा भाग असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट अॅक्शन आणि स्पाय थ्रिलर प्रकारातील असणार आहे. रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

YRF announced Alpha Release Date

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आगामी अल्फा (Alpha) या चित्रपटाबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सने या बहुप्रतीक्षित चित्रपटाची रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर केली आहे. YRF Spy Universe चा भाग असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

अल्फा हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे. यापूर्वी या युनिव्हर्समध्ये एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते.

यशराज फिल्म्सने आपल्या बहुप्रतीक्षित ॲक्शन एंटरटेनर अल्फाच्या थिएटर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या घोषणेसोबतच यश राज फिल्म्स, आलिया भट्ट आणि शर्वरी वाघने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन टीझर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये आलिया भट्टचा लूक ॲक्शन अवतारात दिसतो. तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहे.

आलिया भट्टसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शर्वरी वाघ देखील झळकणार आहे. अल्फा चित्रपट एक थरारक ॲक्शन थ्रिलर आहे. सोबतच अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांचा सामना बॉबी देओलसोबत होणार आहे. विशेष म्हणजे आलिया आणि शर्वरी एक्शन सीक्वेन्स साकारताना दिसतील. अल्फाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT