Bigg Boss Marathi New Season Day 20
योगिता चव्हाण आणि निक्की तंबोली एकमेकींशी भिडल्या  Instagram
मनोरंजन

BBM | वाघिणीने आज ठार केलं..योगिताच्या ॲक्शन मूडमुळे फॅन्सकडून कॉमेंट्सचा पाऊस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. कॅप्टनसीचा टास्क पार पडताना निक्की आणि योगिता एकमेकांसोबत भिडताना दिसल्या.

नॉमिनेशन टास्क असो वा कॅप्टनसीचा...

कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्क दरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसल्या. टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसले.

दरम्यान, योगिताच्या फॅन्सकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. वाघिणीने आज ठार केलं, असे म्हणत एका फॅनने इन्स्टाग्रामवर कमेंट केली आहे. 'बिग बॉस मराठी'चा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार ठरलाय.

SCROLL FOR NEXT