Yere Yere Paisa-3 release date  Instagram
मनोरंजन

Yere Yere Paisa-3 | एकच महिना बाकी! नवा घोटाळा करायला येताहेत अण्णा, आदित्य, बबली, सनी!

Yere Yere Paisa 3 | सिद्धार्थ जाधव-तेजस्विनी पंडीतचा चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी सुपरहिट फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. धमाल विनोद, कमाल कथा आणि एकाहून एक भन्नाट पात्रे घेऊन ‘ये रे ये रे पैसा ३’ येत्या १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या नवीन पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये कॉमेडीचा ट्रिपल धमाका असून एका नव्या मोठ्या गोंधळाची धमाल कहाणी उलगडणार आहे. यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT