Ye Re Ye Re Paisa 3 shooting start in Mumbai
ये रे ये रे पैसा ३ चित्रपटाचे शूटिंग मुंबई येथे सुरु झाले  Vanita Kharat Instagram
मनोरंजन

'ये रे ये रे पैसा ३' मध्ये वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर धुमाकूळ घालणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित "ये रे ये रे पैसा ३" या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते पार पडला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती.

ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा २ या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातील एक गाणेही रेकॉर्ड करण्यात आले होते.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे. तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.

'ये रे ये रे पैसा ३' मध्ये हे असतील कलाकार

चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे.

SCROLL FOR NEXT