पुढारी ऑनलाईन डेस्क - महिला पोलीस पात्र असलेली फ्रेंचायझी मर्दानी आता तिसऱ्या भागात प्रवेश करत आहे. मर्दानी ३ मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. (RaniMukerji)
YRF ने आज जाहीर केले की मर्दानी ३ चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६, शुक्रवार रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात ४ मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे निर्माते हा चित्रपट रक्तरंजित व प्रचंड हिंसक संघर्ष म्हणून सादर करत आहेत – शिवानीच्या निखळ चांगुलपणाचा सामना होणार आहे अत्यंत क्रूर वाईट शक्तींशी. राणी मुखर्जीने याआधीच या चित्रपटाबद्दल सांगतलं होतं की, हा चित्रपट कसा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.