पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेसीचा अभिनयातून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. २०२५ नंतर त्याने अभिनयातून अलविदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर लिहिली असून यामध्ये त्याने त्याचे खासगी कारण दिले आहे.
विक्रांत मेसीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनयाला अलविदा म्हणत असल्याचे जाहीर केले आहे. अलिकडेच रिलीज झालेला त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' सध्या चर्चेत आहे. याआधी तो '12वीं फेल', 'सेक्टर 36' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. उत्तम अभिनयासाठी विक्रांतचे नेहमीच कौतुक होते. त्याचा साबरमती रिपोर्ट हा देखील चित्रपट सध्या चर्चेत आहे. करिअरच्या शिखरावर असताना विक्रांतने असा अचानक का निर्णय घेतला पाहुया.
विक्रांतने सोमवारी सकाळी (२ डिसेंबर) ला पोस्ट लिहिली की, २०२५ नंतर तो अभिनयातून निवृत्ती घेईल. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका नोटमध्ये त्याने लिहिलंय, "मागील काही वर्ष आणि त्याआधीची वेळ अद्भुत राहिली आहे. मी तुम्हा सर्वांचे आभाप मानते, ज्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला. पण, जसे मी पुढे गेलो, तेव्हा मला अनुभव आला की, एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणून ...घरी परतण्याची वेळ आलीय."
त्याने आपल्या पोस्टमध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाला प्राधान्य दिल्याचे म्हटले आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, विक्रांतला आपल्या परिवारासाठी वेळ द्यायचा आहे. फॅन्सना देखील त्याची पोस्ट पाहून धक्का बसला आहे. अखेर विक्रांतने हा निर्णय अचानक का घेतला. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. विक्रांतच्या निर्णयाने त्याचे फॅन्स निराश तर झाले आहेत. पण कॉमेंट देखील करून त्याची विचारपूस करत आहेत.