Anurag Kahsyap on netflix  Pudhari
मनोरंजन

Anurag Kahsyap | नेटफ्लिक्सच्या सीईओला मुर्ख का म्हणाला अनुराग कश्यप? सोशल मीडियात चर्चेला उधाण

Anurag Kahsyap | एकता कपूरशी भागीदारी केल्यानंतर टोला; सॅक्रेड गेम्स आणि क्योंकी सास भी...ची तुलना?

पुढारी वृत्तसेवा

Anurag Kahsyap on Netflix CEO and Ekta Kapoor

मुंबई | बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळेपण जपलेला आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक त्याच्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. आता त्याने चक्क ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या सीईओवरच घणाघाती टीका केली आहे. नेटफ्लिक्सचा सीईओ Ted Sarandos म्हणजे मूर्खपणाची परिभाषा आहे, अशा शब्दांत अनुरागने जोरदार हल्ला चढवला आहे.

अनुराग कश्यपने Netflix च्या "सॅक्रेड गेम्स" या गाजलेल्या वेब सीरीजचे सह-दिग्दर्शन केले होते. भारतात वेबसीरीज कल्चर रूजविण्याचे श्रेय याच सीरीजला जाते. त्यामुळे आता खुद्द अनुरागनेच नेटफ्लिक्सच्या ज्या दिशेने चालले आहे त्यावर नाराजी व्यक्त केल्याने बॉलीवूडमध्ये ही चर्चेची बाब ठरली आहे.

काय म्हणाले होते नेटफ्लिक्सचे सीईओ

निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना टेड सारँडॉस म्हणाले होते की, "माझ्यासाठी, जर मला सगळं पुन्हा करायचं असतं, तर मी ‘Sacred Games’ दोन वर्षांनी केलं असतं का? आणि त्याऐवजी जास्त लोकांना भावणारी (populist) गोष्ट केली असती का? कदाचित. पण आम्हाला माहित होतं की भारतासाठीचा प्रवास हळूहळू होणारा आहे. मात्र शेवटी भारतीय बाजारपेठ हे एक मोठं यश (great prize) ठरू शकतं, हे आम्हाला ठाऊक होतं."

अनुरागचा रिप्लाय...

Instagram वर एका पोस्टमध्ये अनुराग कश्यपvs Netflix CEO च्या नुकत्याच दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. या विधानावर प्रतिक्रिया देताना कश्यप म्हणाला की, "त्याने (टेड सारँडॉस) 'सास बहू' ने सुरुवात केली असती, तर बरोबर झालं असतं. जे तो आता करत आहे. मला आधीच माहीत होतं की टेक्नॉलॉजीवाले कथा सांगण्यात कमी पडतात, पण @tedsarandos हा तर मूर्खपणाची परिभाषा आहे, हे आज समजलं. आता सगळं कळतंय."

एकता कपूर - नेटफ्लिक्स भागीदारी

अनुराग कश्यप यांचा "सास-बहू" संदर्भ नुकत्याच जाहीर झालेल्या Netflix India आणि एकता कपूर यांच्या भागीदारीकडे इशारा करत होता. निर्माती एकता कपूर हीने बालाजी टेलिफिम्सतर्फे "क्युंकि सास भी कभी बहू थी" सारख्या मालिकांनी 2000 च्या दशकात टीव्हीवर वर्चस्व गाजवलं होतं.

तसेच एकताच्या सास-बहू छाप अनेक सीरीयल्स तेव्हा प्रचंड गाजल्या होत्या. तोच ट्रेंड प्रादेशिक भाषेतील मनोरंजन वाहिन्यांनी चालवला होता. किंबहुना अजुनही अशा मालिका हिंदी-मराठीमध्ये येत आहेत.

यापुर्वीही अनुरागने नेटफ्लिक्सवर केली होती टीका

Netflix India च्या सध्याच्या कंटेंटबद्दल नाराजी व्यक्त करत कश्यप यांनी याआधीही मार्चमध्ये एक पोस्टमध्ये म्हटलं होतं की, Netflix India ची स्थिती सध्या गोंधळलेली, विस्कळीत आणि दर्जाहीन आहे. तथापि, तेव्हा नेटफ्लिक्सवरील ब्रिटिश क्राईम ड्रामा Adolescence चे अनुरागने कौतुकही केले होते.

दरम्यान, नेटफ्लिक्सच्या The Royals मालिकेत झळकलेली अभिनेत्री लिसा मिश्रा हिनेसुद्धा कश्यप यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आजकाल OTT वरील सर्व काही derivative आहे, आणि विशेषतः Sacred Games पासूनच प्रेरित." सध्या अनुरागचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT