मनोरंजन

बालपणी कापूस विकत होता ‘पंचायत-३’चा बिनोद, अशोक पाठकची हटके कहाणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंचायत ३ च्या बिनोदची जोरदार चर्चा होत आहे. बिनोदची भूमिका अभिनेता अशोक पाठकने साकारली आहे. नुकताच झालेल्या ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात अशोक पाठक स्टारर चित्रपट 'सिस्टर मिडनाईट'चे प्रीमियर झाले. याठिकाणी त्यांना १० मिनिटांची स्टँडिंग ओवेशन मिळाले. करण कांधारी यांच्या चित्रपटात राधिका आपटे आणि अशोक पाठकने मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कपलची भूमिका साकारली आहे.

अधिक वाचा –

लोकप्रिय वेब सीरीज 'पंचायत ३' मध्ये बिनोद हे नाव खूप चर्चेत आलं. बिनोदची भूमिका अशोक पाठकने साकारली आहे. 'देख रहा है बिनोद' च्या नावाने खूप सारे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत राहिले. 'पंचायत ३' मध्ये अशोक पाठकने बिनोदची भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, इथेपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. बिनोद उर्फ अशोक पाठकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेऊया.

अधिक वाचा –

अशोक पाठक बालपणी विकायचा कापूस

अशोक पाठक बिहारमधील सीवानचा रहिवाशी आहे. बालपणीच तो फरीदाबादला गेला. कामाच्या शोधात तो आपल्या पालकांसोबत फरीदाबादमध्ये गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक पाठकच्या परिवाराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. हेच कारण होतं की, त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी काम करावं लागायचं. एका मुलाखतीत अशोक पाठकने सांगितलं होतं की, तो बालपणी आपल्या काकांसोबत सायकलवरून कापूस विकण्याचा काम करायचा. या प्रकारे जवळपास १०० किंवा १५० रुपये मिळायचे. त्याच्यातूनच उदरनिर्वाह चालायचा.

अशोक पाठकचे अभिनयाने बदललं नशीब

अशोक पाठकने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याला बालपणापासून अभिनयात मन लागायचं. यासाठी त्याने भारतेंदु अकादमीमध्ये प्रवेश घेतला. येथून स्कॉलरशिप मिळाली, तर तो इंजिनिअरिंग करण्यासाठी दिल्लीत आला. एक मुलाखतीत त्याने सांगितलं की, शिक्षणात मन लागायचं नाही. त्यामुळे तो अभिनयाकडे वळला. पुढे अशोक पाठकला पहिला ब्रेक इम्तियाज अलीचा चित्रपट 'हायवे' मधून मिळाला. भूमिका छोटी होती. पण, त्याचा अभिनय सर्वांच्या नजरेसमोर आले. त्यानंतर अशोक पाठकला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली.

अधिक वाचा – 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT