पुढारी ऑनलाईन डेस्क - छावातील ज्वाळांचा तो थरारक सीन ...अगदी छोटासा सीन शूट करण्यात आला होता. जेव्हा स्वत:ला आलमगीर म्हणवणारा औरंगजेब लाखो सैन्य घेऊन दाखल होत असतो. तेव्हा एक साधी मेंढपाळ असणारी एक मुलगी त्याची बळी ठरते. आगीच्या ज्वाळांमध्ये तिला लोटण्यात येतं. मुघलांच्या सैन्यापुढे ती जळताना दिसते. हा सीन करणारी मुलगी म्हणजे मराठमोळी साक्षी सकपाळ. नेक आव्हानात्मक शूट करणारी साक्षी कोण आहे जाणून घेऊया. (Sakshi Sakpal )
औरंगजेब आपल्या लाखो मुघल सैन्यांना घेऊन स्वराज्याच्या दिशेने येत असतो, तेव्हा शेळा-मेंढ्या पाळणाऱ्या या मुलीला येणाऱ्या संकटाचा अंदाज येतो. (Sakshi Sakpal )
साक्षी सकपाळ स्टंटगर्ल आहे. ती डान्सरदेखील आहे. तिला वेगवेगळे स्टंट करायला आवडतात. ती फ्लिप गर्ल म्हणूनही ओळखली जाते. तिचे यु-ट्यूब चॅनेलदेखील असून अनेक स्टंट करतानाचे रिल्स पाहायला मिळतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टंटचे अनेक छोटे-मोठे व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये ती स्टंट प्रशिक्षण घेताना दिसतेय. साक्षीने स्टंट आर्टिस्टचे प्रशिक्षण घेतले आहे.
"छावा" चित्रपटासाठी साक्षीने ऑडिशन दिले होते. मुळात प्रशिक्षित स्टंट आर्टिस्ट असल्याने आपले कौशल्य आणि साहसी दृश्यांसाठी लागणारे कसब तिने ऑडिशनमध्ये दाखवून दिले. यानंतर तिची छावासाठी निवड करण्यात आली. आगीच्या ज्वाळांचा सीन शूट करण्यासाठी छावाच्या टीमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. हा सीन शूट करताना टीममध्ये अनेकांनी आपला श्वास रोखू ठेवला होता. पण मराठमोळ्या साक्षीने धाडसाने हा सीन शूट केला, त्यानंतर तिचे कौतुक होताना दिसतेय. अर्थात, यामागे तिची तिचे साहस आणि मेहनत द्वयी गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.