Deepali Sahay with A R Rahman  pudhari photo
मनोरंजन

Deepali Sahay |'तेरे पास मैं' गाण्यामुळे चर्चेत आलेली दीपाली सहाय कोण? 'इंडियन आयडल'मधील पराभवानंतरही हार मानली नाही

'तेरे पास मैं' गाण्यामुळे चर्चेतील दीपाली सहाय कोण आहे? एकेकाळी 'इंडियन आयडल'मध्ये पत्कारावा लागलेला पराभव

स्वालिया न. शिकलगार

'तेरे पास मैं' या लोकप्रिय गाण्याची गायिका दीपाली सहाय सध्या चर्चेत आहे. बिहारमधून आलेल्या दीपालीने 'इंडियन आयडल 3'मध्ये सहभाग घेतला होता, मात्र तिला विजेतेपद मिळाले नाही. त्यानंतर अभिनय, दिग्दर्शन आणि भोजपुरी लोकसंगीताच्या जतनासाठी काम करत तिने आपला संगीतप्रवास सुरू ठेवला. जवळपास 19 वर्षांच्या संघर्षानंतर तिला ए.आर. रहमान यांच्या संगीतबद्ध 'तेरे पास मैं' या गाण्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे.

Deepali Sahay Tere Paas Main song viral from Main Vaapas Aayunga

तब्बल १९ वर्षांचा संयम ठेवून आज त्याचे फळ दीपाली सहाय या गायिकेला मि‍ळाले आहे. १९ वर्षांपूर्वी बिहारमधील या तरुण गायिकेला 'इंडियन आयडॉल'च्या रिअ‍ॅलिटी शोमधून बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी ती निराश झाली. पण त्यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचालक मिनी माथूरने तिच्याबाबत एक असे भाकीत केले होते, जे आज खरे ठरले. "एक दिवस संपूर्ण देश तुझी गाणी गुणगुणत असेल," आज ते भाकीत खरे ठरल्याचे दिसत आहे.

मैं वापस आऊंगा चित्रपटाती गाण्यामुळे चर्चेत

दीपाली सहायने इम्तियाज अलीच्या 'मैं वापस आऊंगा'मधील 'तेरे पास मैं' गाणे गायले आहे. त्यामुळे ती अचानक सर्वत्र चर्चेत आली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले आणि इरशाद कामिल यांनी लिहिलेले हे गाणे श्रोत्यांच्या पसंतीस उतरले आहे. तिने एका इंग्रजी वेबसाईटला प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मला एक गोष्ट नक्की माहित होती की, मी खूप मेहनत करू शकते आणि मी अशी व्यक्ती नाही जी सहजपणे हार मानेल."

दीपाली सहायला अशी मिळाली संधी

यावर्षी ६ जानेवारी रोजी तिला इन्स्टाग्रामवर संगीतकाराच्या टीमकडून एक संदेश आला. रहमान यांना एका गाण्यासाठी तिचा आवाज रेकॉर्ड करायचा होता. "बॉलिवूडशी कोणताही संबंध नसलेली बाहेरच्या एका कलाकारासाठी, हा अनुभव एखाद्या स्वप्नवत होता,'' असे तिने म्हणते.

तिने सांगितले की, रहमान यांच्या स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करण्यासाठी ती चेन्नईला झाली. पण त्यावेळी गाणे रेकॉर्ड केले पण रहमान यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यावेळी रहमान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. काही महिन्यांनंतर दीपालीची मुंबईत भेट झाली. 'अरे दीपाली, ये, माझ्यासोबत ये'," असे रहमान यांनी तिला हाक मारली आणि सांगितले की, हे गाणे खूपच सुंदर झाले आहे.

पुढे जेव्हा रहमान 'इंडियन आयडॉल १६' मध्ये सहभागी झाले. तेव्हा त्यांनी या चित्रपटातील आपल्या आवडत्या गाण्यांपैकी एक म्हणून 'तेरे पास मैं'ची निवड केली. असे दीपालीने सांगितले. यावेळी दीपालीचा कंठ दाटून आला होता. ती म्हणाली की, "मला रडूच फुटले. असे वाटले की आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. १९ वर्षांपूर्वी जर कोणी मला सांगितले असते की असा दिवस येईल, तर माझा त्यावर विश्वासच बसला नसता."

शालेय शिक्षणादरम्यान तिने 'इंडियन आयडल 3'च्या ऑडिशनमध्ये भाग घेतला. तिच्या आवाजाचे परीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले, मात्र ती विजेतेपदापर्यंत पोहोचू शकली नाही. अनेकांसाठी हा शेवट असू शकला असता, पण दीपालीने हार मानली नाही. शो संपल्यानंतर तिने अनेक लाधव्ह परफॉर्मन्स केले आणि संगीत क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.गायनासोबतच तिने अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. तिने Film and Television Institute of India येथे दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले. तसेच काही दूरदर्शन कार्यक्रम आणि मालिकांमधूनही ती प्रेक्षकांसमोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT