मनोरंजन

‘पंचायत-३’च्या ‘या’ अभिनेत्याला ॲडल्ट चित्रपटांमध्ये करावं लागलं होतं काम

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंचायत ३ या वेब सीरीजमधील सर्व पात्रांची चर्चा होत असताना अभिनेता दुर्गेश कुमारचे नाव समोर आले आहे. 'देख रहा है बिनोद…' या पंचायत वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये एका डायलॉगने दुर्गेश कुमार रातोरात प्रसिद्ध झाला होता. पंचायतच्या भूषण जी उर्फ दुर्गेश कुमारचे पात्र सीझन ३ मध्ये खूप दमदार दिसलं.

ॲमेझॉन प्राईमवरील नुकताच रिलीज झालेल्या पंचायत-३ वेब सीरीजने लोकांना प्रभावित केलं आहे. सोशल मीडियावरददेखील भूषण पात्राची चर्चा आहे. त्याला बनराकस देखील म्हटलं जातं. सीरीजमध्ये ही भूमिका दुर्गेश कुमारने साकारली आहे. छोटीशी भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता दुर्गेश कुमारविषयी जाणून घेऊया.

अधिक वाचा-

बिहारचा सामान्य दुर्गेश कसा झाला अभिनेता?

दुर्गेश कुमार बिहार, दरभंगाचा राहणारा आहे. त्याने 'हायवे', 'बहन होगी तेरी', 'संजू' आणि 'धडक' यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. पण खरी ओळख त्याला 'पंचायत' मध्ये भूषणची भूमिका साकारुन मिळाली. दुर्गेश एक दरभंगा सारख्या छोट्या शहरातील आहे. त्यामुळे अभिनेत्यापर्यंतचा प्रवास इतका सहज घडलेला नाही. एका मुलाखतीत त्याने त्याच्या करियर जर्नी बद्दल सांगितले.

जिथून मी आलो, तिथे अभिनेता बनण्याचाही विचार देखील येणार नाही : दुर्गेश

दुर्गेश म्हणाला, 'आम्ही जिथून आलो, तिथे राहून अभिनेता बनण्याचा विचारदेखील कुणी करू शकत नाही. पण वृतपत्रात मनोज बाजपेयीची जेव्हा फोटो पाहतो, तेव्हा असं वाटायचं की, बिहारचे लोकदेखील हिरो बनू शकतात. जेव्हादेखील कुणी बिहारचा मुलगा वा मुलगी UPSC पास व्हायची, तेव्हा माझे बहिण-भाऊ त्यांचे फोटो दाखवून मला प्रेरणा द्यायचे. त्यानंतर माझ्या भावाने मला थिएटर जॉईन करण्यासाठी सांगितलं. तो म्हणाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी थिएटर जॉईन कर.'

अधिक वाचा-

…म्हणून दुर्गेश कुमारने NSD तून घेतले प्रशिक्षण

'थिएटर करण्यात मला मजा येऊ लागली. त्यानंतर माझ्या भावाने सांगितलं की, १२ वी पास कर. त्यानंतर पाहुया की, थिएटरमध्ये प्रशिक्षण कुठे दिलं जातं? मग समजले की, दिल्लीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. मी आणि माझा भाऊ दिल्लीत आलो. उदरनिर्वाहासाठी नोएडातील एका शाळेत शिकवू लागलो. सोबतच NSD मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.'

अधिक वाचा-

SCROLL FOR NEXT