amurta fadnavis sung deewane hai track  pudhari photo
मनोरंजन

Welcome To the Jungle| ‘वेलकम टू द जंगल’मधील ‘दीवाने हैं’ गाण्याची जादू; अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा?

Welcome To The Jungle's latest track Deewane Hain-‘दीवाने हैं’ ठरले प्रेक्षकांच्या पसंतीचे; अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

स्वालिया न. शिकलगार

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातील ‘दीवाने हैं’ हे गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. अमृता फडणवीस आणि आनंद राज आनंद यांच्या आवाजातील या गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली असून त्याच्या सुरेल संगीत, आकर्षक चित्रीकरण आणि रोमँटिक भावनेमुळे चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.

Deewane Hain Welcome to the Jungle Amruta Fadnavis, Anand Raaj 

वेलकम टू द जंगल या अक्षय कुमार स्टारर चित्रपटाबद्दल आता नवी माहिती समोर आलीय. वेलकम टू द जंगलचे नवे ट्रॅक दिवाने है रिलीज झाले आहे. आनंद राज यांचे हे गाणे पाहता पाहता चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. हे एक मजेशीर डान्स सॉन्ग असून यामध्ये चित्रपटातील कलाकार दिसताहेत. 'वेलकम टू द जंगल' हा 'वेलकम' फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट असून पहिला चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता.

आता नवा चित्रपट २६ जून ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधी दिवाने है हे गाणे चर्चेत आहे. खास म्हणजे आऩंद राज आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले असल्याची माहिती समोर आलीय. 'दीवाने हैं' गाण्यात अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॉनी लिव्हर, दलेर मेहंदी, परेश रावल, जॅकलीन फर्नांडिस, राजपाल यादव आणि अन्य दिग्गज कलाकार आहेत.

हे गाणे संगीतकार आनंद राज आनंद आणि अमृता फडणवीस यांनी गायले आहे. अमृता फडणवीस यांनी याआधी अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांना आवाज दिला आहे.

अक्षय-रवीना अनेक वर्षांनंतर एकत्र

अक्षय आणि खूप वर्षानंतर पुन्हा पडद्यावर एकत्र दिसतील. एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, किंग @akshaykumar ची स्क्रीन प्रेझेन्स अप्रतिम आहे.

एकूणच, अमृता फडणवीस आणि आनंद राज आनंद यांच्या आवाजातील ‘दीवाने हैं’ हे गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT