वीकएंड आला की अनेकांची वॉचलिस्ट बनायला सुरू होते. वीकएंडवर काही धमाल आणि स्पेशल बघण्याचा प्लान करत असाल तर ही लिस्ट अजिबात विसरू नका. या वीकएंडला आमीर आणि अक्षयचे दोन महत्वाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (Latest Entertainment News)
आमीरने संगीतल्याप्रमाणे त्याचा सिनेमा सितारे जमीन पर आज युट्यूबवर रिलीज होतो आहे. हा सिनेमा 100 रुपये शुल्क देऊन पाहता येणार आहे. गुलशन आरोरा नावाच्या एका बास्केटबॉल कोचची ही गोष्ट आहे. हा सिनेमा युट्यूबवर पाहता येणार आहे.
सामान्य माणसाचे स्वतचे घर विकत घेण्याचे स्वप्न आणि त्यासाठी त्याचा अडथळे पार करून होणारा प्रवास म्हणजे 3 बीएचके. वासुदेवन,शांती आणि त्यांची दोन मुले प्रभू आणि आरती असे चौघे स्वतच्या घरासाठी किती प्रयत्न करतात ते या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा सिंपली साऊथ या ओटीटी चॅनेलवर पाहता येणार आहे.
मल्टीस्टारर हाऊसफूल 5 आता ओटीटी वर येण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडमधील एका कौटुंबिक सोहळ्यासाठी जमलेल्या कुटुंबियांचा अभूतपूर्व आणि मजेदार फॅमिली ड्रामा या सिनेमात पाहता येणार आहे. हा सिनेमा अमेजोन प्राइमवर पाहता येणार आहे.
एका सामान्य कुटुंबाची ही गोष्ट आहे. घरातील एक रूम भाड्याने दिल्यावर त्या घरात सुरू होणारे गोंधळ यामध्ये दिसणार आहे. बकैतीमध्ये राजेश तैलंग, शीबा चढ्ढा आणि तनया शर्मा ही मुख्य भूमिकेत आहेत. बकैती झी 5 वर पाहता येईल.
या वीकएंडला जे अॅक्शन बघण्याच्या मूडमध्ये आहेत त्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा. एक डेडली कार रेस जी जिंकणारा जे हवे ते मिळवू शकतो. या सिनेमात अॅक्शन आहेच याशिवाय त्याला फॅमिली टचही आहे. हा सिनेमा सोनी लिव्ह वर पाहता येइल.