Ram Charan film The India House Accident crew injured  Instagram
मनोरंजन

Ram Charan film The India House Accident | राम चरणच्या शूटिंग सेटवर पाण्याची टाकी फुटून दुर्घटना; कोरिओग्राफरसह अन्य क्रू जखमी

Ram Charan film The India House Accident | हैदराबादमधील साऊथ स्टारर राम चरणचा आगामी चित्रपट 'द इंडिया हाऊस'च्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडलीय.

स्वालिया न. शिकलगार

Ram Charan film The India House Accident crew members injured

नवी दिल्ली - हैदराबादमधील साऊथ स्टारर राम चरणचा आगामी चित्रपट 'द इंडिया हाऊस'च्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडलीय. सूत्रांनुसार, सेटवर पाण्याची टाकी फुटून पुरासारखे पाणी बाहेर पडले. सेटवरील सर्व साहित्य, वस्तूंचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोरिओग्राफरसह अन्य क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना एका ॲक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगवेळी झाली. या सीनमध्ये पाण्याचा वापर होणार होता. यावेळी पाण्याची टाकी फुतून शूटिंग फ्लोरवर हजारों लीटर पाणी वाहून गेलं.

హీరో నిఖిల్ సినిమా షూటింగ్లో భారీ ప్రమాదం ది ఇండియన్ హౌస్ సినిమా షూటింగ్లో ఘటన శంషాబాద్ సమీపంలో సముద్రం సీన్స్ తీసేందుకు ఏర్పాటు చేసిన భారీ వాటర్ ట్యాంక్ పగిలిపోవడంతో లొకేషన్ మొత్తం వరద అసిస్టెంట్ కెమెరామెన్ కు తీవ్ర గాయాలు.. మరికొంత మందికి గాయాలు

जखमींवर उपचार सुरु

माहितीनुसार, जखमी क्रू मेंबर्सना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यावेळी राम चरण तिथे उपस्थित होता की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

video- Telugu Scribe x account वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT