Hrithik Roshan War 2 VS Rajinikanth Coolie release same date
मुंबई - रजनीकांतचा 'कुली' हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर २' सोबत बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर वॉर २ येण्यास अद्याप ५० दिवस शिल्लक आहेत.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांतच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या हृतिक रोशनसाठी हे आव्हान असेल. कारण, १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या भगवान दादा या चित्रपटात हृतिकने बाल कलाकार म्हणून काम केले होते आणि त्यासाठी त्याला १०० रुपयेही देण्यात आले होते.
एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन्ही चित्रपटांपैकी सिनेप्रेमींचा कल वॉर २ कडे आहे. कारण अनेक बुकिंग ॲप्सवर वॉर २ ला लोक लाईक्स देताहेत.
वॉर २ मधील हृतिक रोशन, ज्यु. एनटीआर, कियारा आडवाणी या कलाकारांची नवी झलक समोर आली आहे. हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचे नवे पोस्टर्स शेअर केले आहेत. त्याने कॅप्शन्समध्ये म्हटलंय- This time he’s ruthless, merciless, relentless and ready for WAR! Are you? The countdown begins now. #50DaystoWar2 Releasing in Hindi, Telugu & Tamil on August 14th in cinemas worldwide!
आमिर खान कुली चित्रपटामध्ये क्लायमॅक्समध्ये कॅमियो करेल. चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये झालीय. आमिरचा कॅमियो १५ मिनिटांचा असेल. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे क्लायमॅक्स ॲक्शनने भरपूर असेल, ज्यामध्ये अमिताभ आणि रजनीकांत दिसतील.