मनोरंजन

vivek agnihotri : आता विवेक बनवणार ‘दिल्‍ली फाईल्स’!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

'द ताश्कंद फाईल्स' व 'द कश्मीर फाईल्स'नंतर आता दिग्दर्शक विवेक अग्‍निहोत्री 1984 च्या दिल्‍लीतील दंगली व शिखांच्या हत्याकांडावर 'दिल्‍ली फाईल्स' हा चित्रपट बनवणार आहेत. त्यांनी सांगितले, हा चित्रपट 1984 च्या काळ्या अध्यायावर आधारित असेल. यामध्ये तामिळनाडूशी संबंधित सत्यही दाखवले जाईल. या दंगलीत अनेक निरपराधांचे बळी गेले; पण ते लपवले गेले. या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही, यापेक्षा वाईट काय असू शकते. त्यामुळेच इतिहासातील वस्तुस्थिती लोकांना सांगितली तर ते स्वतःची बाजूही मांडतील आणि न्यायाची मागणीही करतील.

SCROLL FOR NEXT