मनोरंजन

विवेक अग्निहोत्रींना ‘दिल्ली फाईल्स’साठी नव्या चेहऱ्यांचा शोध!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द कश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीने आपला आगामी चित्रपटाबद्दल अपडेट्स दिले आहेत. 'द दिल्ली फाईल्स' नावाने हा नवा चित्रपट असणार आहे. अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केले आहे. विवेक अग्निहोत्री 'द दिल्ली फाईल्स' साठी कलाकारांचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात गांधी आणि जिन्ना यांची भूमिका साकरू शकतील, अशा कलाकारांचा शोध सुरु आहे.

अधिक वाचा –

'गांधी' भूमिकेसाठी नायकाचा शोध

'द दिल्ली फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना दोन उत्तम कलाकार हवे आहेत, जे महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांचे पात्र साकरू शकतील. गांधी यांच्या भूमिकेसाठी ट्विट करत लिहिलंय की, 'जर तुम्ही 'द दिल्ली फाईल्स'मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांची भूमिका साकारू इच्छित असाल तर गांधीजी यांच्या वेशभूषेत त्यांच्या कोणत्याही ऐतिहासिक भाषणाची ६० सेकंदाची क्लिप रेकॉर्ड करून पाठवा. रेकॉर्डिंग पाठवण्याची शेवटची तारीख १ जुलै २०२४ आहे'.

अधिक वाचा –

जिन्ना यांच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध

विवेक अग्निहोत्री 'द दिल्ली फाईल्स'साठी जिन्ना यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध घेत आहेत. विवेक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय- 'मैं बुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्सच्या सौजन्य अशा कलाकारांच्या शोधात आहे, जे 'द दिल्ली फाईल्स' मध्ये जिन्ना यांची भूमिका साकारू शकतील…'

अधिक वाचा –

सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट २०२५ मध्ये चित्रपटगृहात रिलीज होईल.

SCROLL FOR NEXT