Vishhal Nikam wedding video viral  instagram
मनोरंजन

Vishhal Nikam |जुळल्या रेशीम गाठी! 'येड लागलं प्रेमाचं' फेम विशाल निकम बोहल्यावर, लग्नाचा व्हिडिओ पाहाच

Vishhal Nikam |जुळल्या रेशीम गाठी! 'येड लागलं प्रेमाचं' फेम विशाल निकम बोहल्यावर, लग्नाचा व्हिडिओ पाहाच

स्वालिया न. शिकलगार

मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेला विशाल निकम आता विवाहबंधनात अडकला आहे. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

अभिनेता विशाल निकमने पारंपरिक पद्धतीने लग्न केले. लग्नसोहळ्यात त्याने पारंपरिक पेहराव केला होता, ज्यात तो अत्यंत देखणा दिसत होता. नवरी, अभिनेत्री अक्षया हिंदलकरनेही पारंपरिक साडी आणि दागिन्यांमध्ये खास लूक साकारला होता. लग्नातील हळदी, साखरपुडा आणि मुख्य विवाह सोहळ्याचे अनेक खास क्षण फोटो, व्हिडिओमधून पाहायला मिळत आहेत.

मराठी लोकप्रिय अभिनेता विशाल निकमने नुकताच आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या विशालने विवाहबंधनात अडकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्याने पुष्पा इम्पॉसिबल फेम अभिनेत्री अक्षया हिंदलकरसोबत सात फेरे घेतले

विशेष म्हणजे देवभूमी उत्तराखंड येथील त्रियुगीनारायण मंदिरात १० फेब्रुवारीला लग्न केले. हा दिवस विशालचा जन्मदिवस आहे

त्रियुगीनारायण हे पवित्र स्थान असून याठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, असे म्हटले जाते

दोघांनी सप्तपदी घेतली, यावेळी परिवार आणि जवळचे मित्र उपस्थित होते

लग्नाआधी त्यांनी गंगाघाट येथे साखरपुडा केला होता

विशालने कॅप्शनमध्ये लिहिलं-चंद्र भागेसारखं प्रेम आपल सखी, मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाई सारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन, कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन..10 Feb 2026

फोटो शेअर करताना अक्षयाने लिहिले होते- 'साता जन्माच्या गाठी' 10 Feb 2026

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT