Kangana Ranaut 
मनोरंजन

Kangana Ranaut : नोकरी लावतो; विशालने कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISFला दिलं आश्वासन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्ये हिमाचलमधील मंडीतून नवनिर्वाचित भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत यांना थप्पड मारण्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना चंदिगडच्या विमानतळार घडली आहे. यावेळी कंगना सिक्युरिटी चेक इननंतर बोर्डिंगसाठी जात होती. दरम्यान सीआयएसएफ कुलविंदर कौर (CISF युनिट चंदिगड एअरपोर्ट) ने कंगना यांना थप्पड लगावली होती. एकिकडे या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे संगीतकार, गायक आणि अभिनेता विशाल ददलानीने कुलविंदरचे समर्थन करत नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.

संगीतकार आणि गायक विशाल ददलानीने सीआयएसएफ अधिकारी कुलविंदर कौर यांना नोकरीचे आश्वासन देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेय की, "सीआयएसएफ अधिकारी कुलविंदर कौर यांच्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली तरी मी त्यांना नोकरी देणार आहे. मी कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही, परंतु, मला या @official_cisf कर्मचाऱ्यांच्या रागाची भावना पूर्णपणे समजली आहे. तसेच CISF कडून तिच्यावर कोणतीही कारवाई केली गेली, तर मी खात्रीने तिला नोकरीची शाश्वती देत आहे. जय हिंद जय किसान."

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतला गुरुवारी दुपारी चंदीगड विमानतळावर एका CISF अधिकाऱ्याने थप्पड मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे. दरम्यान एकिकडे CISF च्या अधिकार्याने असे गैरवर्तन केल्यामुळे चिंता व्यक्त केली गेली. तर दुसरीकडे अभिनेत्रीने यावर भूमिका काय घेणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरून कुलविंदर कौर यांना राग अनावर झाल्याने असे वर्तन केल्याची माहिती समोर आली. यावेळी कंगनाने १००-१०० रूपये घेवून या धरणे आंदोलनात महिला सहभागी झाल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता कंगनाने कौरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मात्र, अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT