Sector 36 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे  Instagram
मनोरंजन

Sector 36 Trailer पाहाच! सीरीयल किलरच्या भूमिकेत विक्रांत मेसी (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - विक्रांत मेसीचा आगामी चित्रपट Sector 36 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याचा मागील चित्रपट १२ वी फेल होता. आता तो नव्या चित्रपटात दिसणार असून त्यामध्ये एका सीरीयल किलरच्या भूमिकेत तो दिसेल.

काही दिवसांपूर्वी नवा चित्रपट 'सेक्टर ३६' ची घोषणा करण्यात आली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दीपक डोबरियाल असेल. तर सीरीयल किलरच्या भूमिकेत विक्रांत मेसी आहे.

'सेक्टर ३६' चा ट्रेलर पाहिला का?

'सेक्टर ३६' चित्रपटाच्या घोषणेनंतर असे वाटत होते की, हा चित्रपट २००६ मधील निठारी कांडवर आधारीत आहे. ट्रेलर रिलीजसह निर्मात्यांनी आता सांगितले आहे की, कहाणी सत्या आणि भीतीदायक घटनेशी प्रेरित आहे. ट्रेलरमध्ये जे दिसतं ते पाहून निठारी कांडची आठवण येते.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, विक्रांत मेसी पोलिस ठाण्यात बसून प्रतीक्षा करत आहे. पोलिस अधिकारीच्या भूमिकेतील दीपक डोबरियाल त्याच्यासमोर येताच तो खडबडून उठतो. सीरियल किलरच्या भूमिकेतील अभिनेता विक्रांत हा मुलांचे अपहरण करतो, त्यांचा खून करतो...सीरियल किलरच्या रूपातील विक्रांत मेसीचे हे रुप खूप भीतीदायक आहे. जेव्हा तुम्ही स्क्रीनवर त्याला पाहता, एक वेगळा अनुभव येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT