Vijay Sethupathi Maharaja Hollywood Remake: तमिळ फिल्मस्टार विजय सेतूपती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यम यांची प्रमुख भूमिका असलेल्या महाराजा चित्रपटाचा हॉलीवूडमध्ये रिमेक होणार आहे. विशेष म्हणजे हॉलीवूडमध्ये रिमेक होणारा हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निथिलन स्वामीनाथन यांनी केलं होतं.
हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. आता याचा हॉलीवडूमध्ये रिमेक होणार असून या रिमेकमध्ये मॅथ्यू मॅकॉनहे भूमिका साकारणार आहे अशी माहिती मिळत आहे.
बुधवारी महाराजाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या हॉलीवूड रिमेकबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, महाराजा ही हॉलीवूडमधील एका मेजर स्टुडिओकडून रिमेक होणारा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.' निर्मात्यांनी याचा हॉलीवूडमध्ये रिमेक होणार आहे यावर अधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब केलं.
महाराजा चित्रपटात मॅथ्यू मॅकॉग्ले काम करणार आहे अशी बातमी आली होती. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक सुदन सुंदरम यांनी सांगितलं की महाराजाने चीनमध्ये ९१ कोटी रूपयांची कमाई केली. यानंतर एजन्सीने याचे रिमेक राईट्स खरेदी करण्यासाठी आमच्याकडे विचारणा केली होती. त्यांनी त्यावेळी देखील सांगितलं होतं की या चित्रपटात A लिस्ट स्टार असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रोडक्शन फ्लोअरवर जाणार आहे. ज्यावेळी त्यांना मॅथ्यू बाबत विचारलं त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील तो देखील एक अभिनेता असू शकतो. आम्ही त्याच्यासोबत बोलत आहोत इतकंच एजन्सीने सांगितलं.