Vijay Deverakonda new movie announced  pudhari photo
मनोरंजन

Vijay Deverakonda | लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मोठा धमाका! 'हाय नाना'च्या दिग्दर्शकासोबत नव्या चित्रपटाची घोषणा

Vijay Deverakonda new movie announced | लग्नानंतर नव्या चित्रपटाची घोषणा, दिग्दर्शक शौर्ययुवसोबत कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार विजय देवरकोंडा

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये रश्मिका मंदानासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर, विजयने आता आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'हाय नन्ना' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक शौर्ययुव यांच्यासोबत विजय एका 'मायथॉलॉजिकल' (पौराणिक) पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडाचा आजवर कधीही न पाहिलेला लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने 'रौडी' चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Vijay Deverakonda upcoming movie announced with Shouryuv

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'सेन्सेशनल स्टार' विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवत आहे. नुकतेच अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर (ViRosh Wedding) विजयने आता पुन्हा एकदा कामाचा वेग वाढवला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या मोठ्या चित्रपटाची घोषणा झाली असून, विजयने 'हाय नाना' फेम दिग्दर्शक शौर्ययुव यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.

या चित्रपटात विजय याआधी कधीही न दिसलेल्या अवतारात दिसणार आहेत. अनाउन्समेंट पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा लोखंडी साखळ्यांनी बांधलेल्या चार कुत्र्यांसह पुढे चालताना दिसतात, तर त्यांच्या मागे ६-७ माणसं चालताना दिसतात.

शौर्ययुव आणि विजयची जोडी!

दिग्दर्शक शौर्ययुव यांनी त्यांच्या पहिल्याच 'हाय नन्ना' चित्रपटामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ते विजय देवरकोंडाला एका वेगळ्याच रूपात सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक भव्य 'मायथॉलॉजिकल' (पौराणिक) ॲक्शन ड्रामा असणार आहे. विजयने आजवर अनेक चॉकलेटी बॉय किंवा ॲग्री यंग मॅनच्या भूमिका केल्या आहेत,

लग्नानंतरचा पहिला मोठा निर्णय

विजय आणि रश्मिकाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न केले होते. विजय आता कामावर परतला आहे. शौर्ययुव यांनी विजयला जी कथा ऐकवली, ती विजयला इतकी आवडली की त्याने लगेच या प्रोजेक्टला होकार दिल्याचे समजते. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात भारतीय इतिहासातील किंवा पौराणिक कथांमधील काही छटा पाहायला मिळू शकतात.

दिग्दर्शक शौर्ययुव, ज्यांनी ‘हाय नन्ना’ या चित्रपटातून तेलुगू प्रेक्षकांची मने जिंकली होती. वायरा (Vyra) बॅनरखाली बनणारा या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या टीमने ‘दॅट्स अ रोअर’ या नावाने एक थीम सॉंगही रिलीज केलं आहे. हे गाणं सांगतं की आयुष्य कितीही कठीण प्रसंग तुमच्यासमोर उभे करत असलं तरी हार मानायची नाही. हे दाखवतं की एखादी व्यक्ती वेदना, संघर्ष आणि अपयशांचा सामना करूनही पुन्हा उभं राहण्याचा आणि पुढे जाण्याचा निर्णय कसा घेते.

खास टेक्निकल टीम

या प्रोजेक्टची सर्वात खास बाब म्हणजे त्याची वर्ल्ड-क्लास टेक्निकल टीम: अलेजांद्रो मार्टिनेज (DOP), जे ‘हाउस ऑफ द ड्रॅगन’ आणि ‘फॉलआउट’सारख्या ग्लोबल प्रोडक्शन्ससाठी ओळखले जातात, ते या चित्रपटात आंतरराष्ट्रीय व्हिज्युअल स्टाईल आणत आहेत. सुरेश सेल्वराजन (प्रॉडक्शन डिझायनर), जे ‘एनिमल’ आणि ‘ओम शांती ओम’सारख्या भव्य चित्रपटांच्या दुनियेचे निर्माते आहेत. एरिक डर्स्ट (VFX सुपरवायझर), ज्यांनी ‘गॉड्स ऑफ इजिप्ट’, ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ आणि ‘स्नोपियरसर’सारख्या चित्रपटांवर काम केले आहे. हेशम अब्दुल वहाब (संगीत दिग्दर्शक), जे भारतातील प्रभावशाली संगीतकारांपैकी एक आहेत. प्रवीण अँटोनी (एडिटर), जे प्रभावी कथांना आकार देण्यासाठी ओळखले जातात, आणि सचिन लोवलेकर (कॉस्च्युम डिझायनर), ज्यांच्या नावावर अनेक उल्लेखनीय चित्रपट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT