विकी कौशल- रश्मिकाचा 'छावा' १५० कोटींच्या घरात; दर्जेदार चित्रपटांना टाकलं मागे  chhaava film collection
मनोरंजन

विकी कौशल- रश्मिकाचा 'छावा' १५० कोटींच्या घरात; दर्जेदार चित्रपटांना टाकलं मागे

chhaava film collection : विकी कौशल- रश्मिकाचा 'छावा' १५० कोटींच्या घरात; दर्जेदार चित्रपटांना टाकलं मागे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) रोजी प्रदर्शित झाला. रिलीज झालेल्या पहिल्या दिवसापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोष अशी कमाई करत आहे. आता तब्बल ४ दिवसात बॅाक्स ऑफिसवर १४५ कोटींचा गल्ला कमवला आहे. यामुळे जवळपास हा चित्रपट १५० कोटींच्या घरात पोहोचला आहे. तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात १६४.७५ कोटी रुपये कमावले आहेत.

'छावा' हा चित्रपट 'लक्ष्मण उतेकर' यांनी दिग्दर्शित केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भरघोष अशी कमाई करण्यास सुरूवात केली होती. तेव्हापासून या चित्रपटाचे आकडे वाढतच गेले आहेत. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, सोमवारी 'छावा' चित्रपटाच्या कमाईत ५० टक्क्यांनी घट झाली. या चित्रपटाने चौथ्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने ४ दिवसांत १४५.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात १६४.७५ कोटी रुपये कमावले आहेत. यापुढे हा चित्रपट २०० कोटींच्या घरात जाईल असे बोलले जात आहे. या चित्रपटाला विकेंडचाही फायदा होणार असून यापुढेही चित्रपटाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी रुपये आणि शेवटच्या चौथ्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले आहे. यामुळे एकूण जवळपास १४५ कोटींच्या घरात पोहोचला आहे.

'छावा'ने दर्जेदार चित्रपटांना टाकले मागे

'छावा' हा विकी कौशलचा पहिल्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. तसेच, विकी कौशलचा हा एकमेव चित्रपट आहे ज्याने एकाच आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर शतक ठोकले आहे. पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनच्या बाबतीत, हृतिकच्या 'फायटर' (११५ कोटी), 'पद्मावत' (११४ कोटी), 'कल्की २८९८ एडी' (११२ कोटी १५ लाख), 'भूल भुलैया ३' (११० कोटी २० लाख) आणि 'दंगल' (१०७ कोटी) या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT