मनोरंजन

Varun Dhawan : यंदाचे वर्ष वरुणसाठी निराशाजनक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अभिनेता वरुण धवन ( Varun Dhawan ) याच्यासाठी २०२२ हे वर्ष फार काही विशेष खास ठरले नाही. यावर्षी त्याने बॉलीवूडमधील दहा वर्षे पूर्ण केली. पण २०२२मध्ये प्रदर्शित झालेले त्याचे दोन्हीही चित्रपट फार कमाई करू शकले नाहीत. त्यामुळे वरुण निराश झाला आहे.

यावर्षी वरुणचे ( Varun Dhawan ) 'जुग जुग जिओ' आणि 'भेडिया' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. २०२० सालच्या लॉकडाऊनपासूनच त्याचा कठीण काळ सुरू झाला असे त्याने नुकतेच एका मुलाखतीत बोलून दाखविले.

तो म्हणाला, २०२० पासून ते आतापर्यंत मला अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले. लॉकडाऊनमुळे कुली नंबर-१ ओटीटीवर रीलिज झाला. मी 'जुग जुग जियो' आणि 'भेडिया' हे दोन चित्रपट यावर्षी केले. हे दोन्ही चित्रपट आणि 'बवाल' हा चित्रपट साईन करण्यासाठी मला खूप वाट पहावी लागली. चित्रपटांच्या बाबतीत २०२२ हे वर्ष माझ्यासाठी निराशाजनक होते, असे वरूण म्हणाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT