'बेबी जॉन' टीझर रिलीज झाला आहे  instagram
मनोरंजन

आजपर्यंत वरुण धवनचा न पाहिलेला खतरनाक लूक, 'बेबी जॉन' टीझर रिलीज

Baby John Trailer | वरुण धवनच्या ॲक्शन लूकने लावली आग

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - वरुण धवन स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'बेबी जॉन'चा टीझर आज रिलीज झाला. 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीची पत्नी प्रिया एटलीने 'बेबी जॉन'ची निर्मिती केलीय. वरुण धवनचा हा मास ॲक्शन चित्रपटाची रिलीज डेट जवळ आहे. आता बेबी जॉनमधील वरुण धवनचा खतरनाक लूक समोर आला आहे. असे म्हटले जात आहे की, 'बेबी जॉन' वरुण धवनने आपल्या चित्रपट करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट करत आहे.

अॅक्शनने भरपूर बेबी जॉनचा टीझर

बेबी जॉनच्या टीझरची सुरुवात एका मुलापासून होते. तो लहानपणीचा वरुण धवन आहे. पुढे वरुणला टीझरमध्ये ॲक्शन करताना पाहिलं जाऊ शकतं. वरुण धवन संपूर्ण टीझरमध्ये ॲक्शन लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये चित्रपटाची हिरोईन कीर्ति सुरेश आणि वामिका गब्बीची झलकदेखील पाहायला मिळाली. दुसरीकडे चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ विलेन म्हणून दिसत आहे.

बेबी जॉन कधी रिलीज होणार?

बेबी जॉन चित्रपटाची कथा कलीश यांनी लिहिली आहे आणि त्यांनीच चित्रपट दिग्दर्शित केलं आहे. बेबी जॉन एटलीचा चित्रपट थेरीचे ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. थेरी २०१६ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये थलापती विजय आणि सामंथा रुथ प्रभुने मुख्य भूमिका साकारली होती. तर बेबी जॉनमध्ये वरुण धवन सोबत साऊथ अभिनेत्री कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव दिसणार आहेत. असे म्हटले जात आहे की, सलमान खानचा यामध्ये कॅमियो पाहायला मिळेल. बेबी जॉन ख्रिसमसला २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT