मनोरंजन

सारा-वरूणच्या ‘कुली नंबर १’ चा ट्रेलर पाहाच

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन यांचा आगामी 'कुली नंबर १' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  

'कुली नंबर १' या चित्रपटाच्या ३ मिनिट १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि वरुणचा रोमॉटिक अंदाज पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका परेश रावल यांनी साकारली आहे. परेश रावल हे स्वत:च्या मुलीसाठी (सारासाठी) अतिशय श्रीमंत मुलगा शोधत असतात. तेव्हा त्यांची भेट वरुण धवनशी होते. हा चित्रपट कॉमेडी भरलेला आहे. 'कुली नंबर १' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर १ लाखांहून अधिक चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

अधिक वाचा : अभिनेत्री नेहा महाजनचा सातासमुद्रापार डंका!

तसेच वरुणने या चित्रपटाचे एक पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरवरून या चित्रपटात वरूणच्या पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

अधिक वाचा :  'मिर्जापूर'चा रॉबिन प्रियांशू पेनयुली विवाहबध्द (Photo)

'कुली नंबर १' या चित्रपटात सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादव यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी आणि दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. 'कुली नंबर १' हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कुली नंबर १' हा चित्रपट १९९५ साली रिलीज झालेल्या कुली नंबर १ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. यामुळे 'कुली नंबर १'च्या भूमिकेत गोविंदा आवडतो की, वरुण धवन हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

 (video: Amazon Prime Video India youtube वरून साभार)

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT