अक्षया देवधरची नवी वेबसीरीज "वर्गमंत्री"चा ट्रेलर लाँच instagram
मनोरंजन

Marathi Web Series Vargamantri Trailer|"वर्गमंत्री" वेबसीरीजचा होणार कल्ला

अक्षया देवधरची नवी वेबसीरीज "वर्गमंत्री"चा ट्रेलर लाँच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - खास रे टीव्हीतर्फे वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे अनेक स्टारकास्ट या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबरपासून ही वेबसीरीज आपल्या भेटीला येणार आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे नरेंद्र फिरोदिया यांनी वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन संजय, अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे. कृष्णा जन्नू यांनी संकलन, अजय घाडगे यांनी छायांकन, निरंजन पाडगावकर यांनी संगीत, श्रेयस एरंडे यांनी पार्श्वसंगीत, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी यासाठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्री पदासाठीची निवडणूक घेण्याचे शाळेत ठरवले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणे, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल वर्गमंत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT