रेबेल कीड म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा माखीजा आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अपूर्वाचा एक्स बॉयफ्रेंड उत्सव दहियाने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उत्सवने एक गाणे शेयर केले आहे. यामध्ये त्याने आधीच्या नात्याबाबत हिंट्स दिल्या आहेत. इंस्टाग्रामवरील या गाण्याने उत्सवने त्याची एक्स अपूर्वा माखिजाला टारगेट केल्याचे अनेक नेटीझन्सचे म्हणणे आहे. उत्सवने क्युट लिटिल रेड फ्लॅग हे गाणे रिलीज केल्यापासून या चर्चेला तोंड फुटले आहे. (Latest Entertainemt News)
बँकर असलेला उत्सव दहिया ट्रॅवल व्लॉग बनवतो, याशिवाय स्वत: कंपोज केलेली गाणीही सोशल मीडियावर शेयर केली आहेत. त्याचे 94 हजार फॉलोअर्स आहेत.
17 ऑगस्टला दहियाने त्याचा ओरिजिनल ट्रॅक क्युट लिटिल रेड फ्लॅग इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या गाण्यातील तिरकस भाव, लक्षवेधी भाषा याने हे गाणे लगोलग नेटीझन्सच्या पसंतीस उतरले. यामुळे हे गाणे अपूर्वासाठीच असल्याचे अनेकांचा समज झाला. त्याबरोबरच या व्हीडियोच्या कॅप्शननेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तो पोस्ट मध्ये म्हणतो, जर तुम्ही खोटे पसरवत राहिलात तर मीही सगळी पाने उलगडेन. सहानुभूती पसरवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवू नका. मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या दर्शकांना भडकवण्यासाठी दुसऱ्यांना धमकी देण्याचा आधिकार मिळत नाही.’
अपूर्वा आपल्या एक्सचा उल्लेख कायम टॉक्सिक प्रेमी असा करायची. नेटीझन्सनी हे गाणे अपूर्वाशी जोडले आहे. यादरम्यान अपूर्वाने ब्रेक अप दरम्यान त्याच्यावर खोटारडेपणाचे आरोप लावले होते. यासंदर्भात अपूर्वा आणि तिच्या टीमसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, 'तू कोणी मोठी व्यक्ति नाहीस, नशीब समज तिने तुला डेट केले' असे उत्तर मिळाले होते.
याला गाण्यातून उत्तर देताना उत्सव म्हणतो, ‘ मी अजूनही इथेच आहे. स्थिर उभा आहे. खऱ्या गोष्टीना फॉलोअर्सची गरज नसते. याचा शेवट त्याने ग्रो अप किड असा केला आहे. ज्यातून हे गाणे रेबेल किड म्हणजेच अपूर्वासाठी असल्याचे बोलले जात आहे.