लोकप्रियता आणि पैसा आला की, बॉलीवूड सेलिब्रिटी आलिशान जीवन जगत असतात. आता प्रत्येक बॉलीवुड सेलिब्रिटींकडे महागडे बंगले आणि आलिशान गाड्यांचा खूपच भरणा आहे. याच दरम्यानच 'सोनू की टिटू की स्वीटी', 'अकेली' फेम अभिनेत्री नुसरत भरुचा हिने स्वतः साठी महागडी कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर तिने नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. नुकतेच नुसरत नवीन कारमधून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आली होती. तिथे तिने फोटोशूटही केले आणि पापाराझीसमोर पोज दिली. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. नुसरतने काळ्या रंगाची नवी कोरी रेंज रोव्हर कार विकत घेतली आहे. या कारची किंमत सुमारे २ कोटी रुपये इतकी आहे. नव्या कोऱ्या गाडीतून ती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. तिने यावेळी लाल रंगाचा ड्रेस घातला होता. सध्या भारतात या कारला खूप मागणी आहे. नुसरतने स्वतःलाच है दिवाळी गिफ्ट दिले आहे. तिने कारची पूजा केली, फुले वाहिली. तिने सर्वांचे आभारही मानले आहेत. नुसरतचा २०२३ मध्ये 'अकेली' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.