Urvashi Rautela  
मनोरंजन

उर्वशी रौतेलाने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कान्सचे वातावरण केले लाल 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलवर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. कारण रेड कार्पेटवर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. दीप्ति साधवानी शिवाय नमिता थापर आणि अंकुश बहुगुणा यासारख्या नव्या चेहऱ्यांनी डेब्यू केला. आता ऐश्वर्या राय बच्चन नंतर उर्वशी रौतेलाने जलवा दाखवला आहे. ओपनिंग सेरेमनी मध्येही ती सहभागी झाली होती. हॉलीवूड आयकॉन मेरली स्ट्रीप सोबत व्यासपीठ शेअर केला होता. आता ती रेड कार्पेटवर दिसली आहे.

उर्वशी रौतेलाच्या या खास गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील

  • उर्वशी रौतेला एक ट्रेंड डान्सर आहे.
  • तिने भरतनाट्यम, कथ्थक, जँज, हिप-हॉप, बेली डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे.
  • ती बिझनेसमॅन फॅमिलीतून आलेली आहे
  • रौतेला कुटुंबीयांचे एक लक्झरी ब्यूटी सलून आहे
  • रिअल लाईफमध्ये ती नॅशनल लेवल बास्केटबॉल खेळाडू होती
  • ओपनिंग सेरेमनीमध्ये दीपिका पदुकोनला केलं होतं कॉपी
  • Urvashi Rautela चा दुसरा लूक समोर

उर्वशीचा कान चित्रपट महोत्सवातून दुसरा लूक समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय आणि ती खूप यामध्ये खूप दिसत आहे. तिने रेड कार्पेटवर खूप सुंदर फोटो पोज दिले.

कसा आहे उर्वशी रौतेलाचा दुसरा लूक

ऑफ शोल्डर गाऊनवर कर्ली हेअर्स आणि कलरफूल आय मेकअप असा लूक केला होता. कान्समध्ये उर्वशीचा लूक इतर सेलिब्रिटींपेक्षा थोडा वेगळा दिसत होता. तिने रेड आऊटफिटवर कोणतीही ज्वेलरी घातली नव्हती. याआधी उर्वशी कान चित्रपट फेस्टिव्हलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने हॉलीवूड आयकॉन मेरली स्ट्रीपसोबत स्टेज शेअर केला होता.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT