Urvashi Rautela 
मनोरंजन

Urvashi Rautela : अमेरिकन AI कंपनीविरोधात उर्वशी रौतेला ठोकणार तब्बल ७,००० कोटींचा दावा; विनापरवाना फोटो, व्हिडीओ वापरले

लॉस एंजिलीस येथील कंपनी, इन्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती

Namdev Gharal

Urvashi Rautela बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेलाने एका अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनीविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीविरोधात रौतेला हिले ७ हजार कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकणार आहे.

याबाबतची एक पोस्ट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसस्थित एका कंपनीने तिचे नाव, फोटो आणि व्हिडिओंचा विनापरवानगी गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारल्याचा गंभीर आरोप रौतेला हिच्या टीमने केला आहे.

काय आहे उर्वशीच्या टीमचा आरोप?

उर्वशीच्या टीमने पोस्टमध्ये नमूद केले आहे की, "आम्ही लॉस एंजेलिसस्थित या कंपनीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. यामध्ये अंदाजे ७,००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या मागणीचा समावेश आहे. या कंपनीने उर्वशीचे नाव, छायाचित्रे आणि व्हिडिओ विनापरवानगी वापरून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल केली आहे. तुम्हाला तुमची AI कंपनी किंवा ब्रँड तयार करायचा असेल तर स्वतःच्या बळावर करा; पण उर्वशीची अधिकृत परवानगी असल्याशिवाय तिच्या नावाचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही." दरम्यान, ही कायदेशीर कारवाई कोणत्या कंपनीविरुद्ध केली जात आहे, याचे नाव अद्याप तिच्या टीमकडून जाहीर करण्यात आलेले नाही.

डीपफेक आणि AI तंत्रज्ञानाचा गैरवापर

सध्या मनोरंजन विश्वात डीपफेक आणि AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सेलिब्रिटींचे खोटे व्हिडिओ तसेच फोटो बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या 'पर्सनॅलिटी राइट्स'चे संरक्षण करण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. उर्वशीच्या या कठोर भूमिकेमुळे आता विनापरवानगी कलाकारांची ओळख वापरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरही चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT