तृप्ती डिमरी डिमरी हिला 'अॅनिमल' सिनेमाच्या यशानंतर खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. नुकतेच तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'अॅनिमल' या सिनेमात बोल्ड सीन दिल्यानंतर तिला खूपच टीकेचा सामना करावा लागला. इतकेच नाही, तर तिला एका डान्समुळेही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अशातच तृप्तीच्या त्या डान्सवरून आता अभिनेत्री उर्फी जावेद हिनेही तिची खिल्ली उडवली तृप्ती आणि विकी कौशल यांचा 'बॅड न्यूज' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला सिनेमातील 'मेरे मेहबूब' या गाण्यात तिने केलेला डान्स अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. यावर आहे. होता.
या एका मुलाखतीत उर्फी म्हणाली की, तृप्ती ही खूप चांगली अभिनेत्री आहे. ती खूपच सुंदर आहे; पण डान्सवावतीत ती मागे राहिली आहे. तिने केलेल्या डान्स स्टेप वाईट आहेत. इतकी गोड मुलगी, इतकी छान अभिनेत्री; पण तिने स्वतःचे काय करून घेतले ते पाहा. आता ऊर्फीच्या वक्तव्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. उर्फी खरे बोलत आहे. तृप्तीला डान्स करताच येत नाही; पण तरी ती मला आवडते, अशी प्रतिक्रिया एकाने, तर मी पहिल्यांदाच उर्फी हिच्या मताशी सहमत आहे, अशी दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली. तृप्ती अभिनेत्री आहे, डान्सर नाही. तिने नुकसान करून घेतले असल्याची तिसऱ्या एकाने म्हटले आहे.