ajay gogavale  
मनोरंजन

सोयरीक चित्रपटातील गोंधळाला अजय गोगावलेचा आवाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन :

नवरात्रैात्सवात आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना  केली जाते.  गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. सोयरीक चित्रपटाची निर्मिती नाईंटीनाईन प्रोडक्शन्स आणि बहुरूपी प्रोडक्शन्स यांची आहे. सोयरीक या मराठी चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी हा गोंधळ गायला आहे.

डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा
पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला
आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं…..

असे बोल असणारा हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला आहे. संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

गोंधळाबद्दल बोलताना अजय म्हणतात- जोगवा नंतर या चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने 'मळवट' या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमलं. हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या 'अदिती म्युझिक' कंपनीने या गाण्याचे हक्क घेतले आहेत.

आपल्यातल्या स्वार्थ अन् निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते. त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची 'सोयरीक' अवलंबून असते. हेच मांडायचा प्रयत्न 'सोयरीक' चित्रपटात करण्यात आला आहे. मकरंद माने लिखित दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित 'सोयरीक' हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT