पुढारी ऑनलाईन डेस्क : Udit Narayan | लोकप्रिय बॉलीवूड गायक उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका लाईव्ह कार्यक्रमात उदित नारायण यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिला चाहतीला किस केले. या व्हिडिओवरून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडिओवर उदित यांनी 'हम तो डिसेंट है' असे स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, उदित नारायण शोमध्ये 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे हिट गाणे गाताना दिसत आहेत. काही महिला चाहत्या त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ पोहोचतात. उदित देखील प्रथम त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. एक महिला चाहती स्टेजजवळ येते, सेल्फी काढल्यानंतर ती उदित यांच्या गालावर किस केले. मग उदित यांनीही तिच्या ओठांवर किसे केले.
६९ वर्षीय उदित नारायण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उदित यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याला 'एक्सप्रेशन ऑफ लव' म्हटले. ते म्हणाले की, आम्ही सभ्य लोक आहोत. ही गोष्ट व्हायरल करून काय करायचे? गर्दीत बरेच लोक होते आणि आमचे अंगरक्षकही होते. पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळायला हवी. काही लोक शेकसाठी हात पुढे करतात, काही लोक हाताचे चुंबन घेतात. हा सर्व वेडेपणा आहे, त्याकडे जास्त लक्ष देऊ नये, असे उदित यांनी म्हटले आहे.
उदित नारायण पुढे म्हणाले की, 'माझ्या कुटुंबाची प्रतिमा अशी आहे की प्रत्येकाला वाटते की वाद व्हावा. माझा मुलगा आदित्य नेहमीच शांत राहतो. वादात पडत नाही. मी स्टेजवर गातो तेव्हा एक प्रकारचा वेडेपणा येतो. चाहते माझ्यावर प्रेम करतात, मलाही वाटते की त्यांना आनंदी राहू द्या. आपण तसले लोक नाही आहोत. पण, आपल्याला चाहत्यांनाही खूश करावे लागते. मी ४६ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. माझी प्रतिमा तशी नाही. जेव्हा चाहते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतात तेव्हा मी हात जोडतो. कारण हा क्षण पुन्हा येईल की नाही या विचारात मी स्टेजवर नतमस्तक होत असतो.