सौ. प्रताप मानसी सुपेकर  
मनोरंजन

सौ. प्रताप मानसी सुपेकर : प्रतापचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार मानसी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणावर 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'ची मनमोहक कथा अनुभवा, जिथे प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट आणि भावनांचा उलगडा पाहायला मिळेल. या शोमध्ये मानसीची मुख्य भूमिका निभावत असलेली तन्वी किरण ही रेखा बडेद्वारा अभिनीत भामिनीने मांडलेल्या आव्हानांना सामोरे जाताना प्रेक्षकांना दिसेल.

मानसीला घरात न राहण्यासाठी आणि असह्य करण्यासाठी भामिनी अनेक आव्हाने तयार करते. स्वयंपाकाच्या कामांपासून ते एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगात तिला गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत, भामिनीच्या विकृत योजनांना सीमा नाही. पण, अनपेक्षित दैवी शक्तींच्या हस्तक्षेपांच्या मदतीने, मानसी तिच्या मार्गात आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करते.

मानसीची भूमिका साकारणारी तन्वी किरण स्टोरी लाईन बद्दल सांगताना म्हणाली, "प्रेम आणि दृढनिश्चय किती मजबूत असू शकतो हे ही कथा दाखवते. माझे पात्र जिद्द आणि आव्हानांवर मात करण्याची क्षमता दर्शवते. माझ्या व्यक्तिरेखेचा प्रवास कठीण परिस्थितीत असतानाही खंबीर राहणे आणि मी ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी संघर्ष करणे असा आहे. हे माझ्या भूमिकेतील असे गुण आहेत जे वास्तविक जीवनातही मी कोण आहे हे दर्शवते."

भामिनीच्या योजनांनी प्रभावित झालेला प्रताप मानसीपासून अंतर ठेवू लागल्याने तणाव वाढतो. परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी, मानसीची आई तिला घरात राहू देत नाही, म्हणून मानसीला एक रात्र बाहेर काढावी लागते. आता मानसी समोर प्रतापचा विश्वास आणि आपुलकी मिळवण्याचे एक आवाहन उभे आहे , या आव्हानांना समोर मानसी खंबीरपणे उभी राहू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' दर सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता शेमारू मराठीबाणावर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT